
मिरज ता. ५ : सिव्हिल हॉस्पिटल येथून तीन दिवसाचे जन्मलेले बाळ चोरून नेणाऱ्या संशयित महिलेस बाळांसह अवघ्या ४८ तासात सावळज येथून महात्मा गांधी पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळ सुखरूप असून सारा सायबा साठे असे ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेले नाव आहे. मिळालेल्या सी.सी.टी व्ही फुटेजच्या आधारे शोध लावण्यात आला. महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सनी शिंदे व त्यांच्या पथकाने हि कामगिरी केली.