
सांगली दि. 29 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन-२०२४ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा. खाजगी कंपनी या मधील आस्थापना, सर्व दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी) या मधील कामगार / अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे सहाय्यक कामगार आयुक्त एम. ए. मुजावर यांनी शासकी य प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवशी सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.
आस्थापनेने निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली दूरध्वनी क्रमांक ०२३३-२९५०११९. अथवा ई-मेल आयडी – laboursveep@gmail.com या ठिकाणी तक्रार दाखल करावी, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रार येथे करावी…