कुपवाड मिरज रोड खतीबनगर जवळ दोन दुचाकीचा अपघात

कुपवाडकडून मिरजकडे जाणाऱ्यारोडवर अँकसेस दुचाकीला सीबीशाईन दुचाकीस्वाराने मागून जोराची धडक दिली. या धडकेत अँकसेस वरील एक शाळकरी विद्यार्थी व त्याचे एक नातेवाईक धडकेत खाली उडून पडले, त्यात शाळकरी विद्यार्थी हा गंभीर जखमी झाला.
त्याच्या डोक्यास इजा झाली असून उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले, तर सीबीशाईन दुचाकी चालकाने मागून अँकसेसला धडक दिल्याने तो दुचाकीवरून रस्तावर जोराणे पडल्याने त्याच्या डोक्यास गंभीर इजा झाली असून डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला, घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेऊन सीबीशाईन जखमी दुचाकी चालकास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.