सदर व्यक्तीची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस

कर्नाटक : तीर्थक्षेत्र जेजुरी येथे कर्नाटक मधून देवदर्शनासाठी आलेले शिवाजी ज्योती माने वय ७२ दिनांक ६ रोजी नंदी चौक येथून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले असून या बाबत त्यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील रद्देहट्टी गावातून शिवाजी माने हे नातेवाईकांना सोबत रविवार दिनांक ६ रोजी जेजुरी येथे खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आले होते. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नंदी चौकातून ते हरवले आहेत. त्यांचे वय ७२ असून उंची ५ फूट,चेहरा उभट, नाकाने सरळ, केस काळे पांढरे, अंगावर पांढऱ्या रंगाची कुर्ती, पांढरे धोतर, हातावर व पायावर पांढरे कोड, मराठी व कन्नड भाषा अवगत अशी त्यांची माहिती असून त्यांचे नातेवाईक सुभाष मारुती माने यांनी सदर व्यक्ती हरवले असल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.
सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यास जेजुरी पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक 02115 253129 तसेच 9632901515 या वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.