आरग येथे कॉलेजच्या बस मध्ये बसण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

मिरज : प्रतिनिधी

आरग , ता.२९ : येथे कॉलेजच्या बस मध्ये बसण्याच्या कारणावरून कांबळे गट व नाईक गटामध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवार (ता.२८) घडली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात पृथ्वीराज सुरेश कांबळे व्यवसाय ड्रायव्हिंग (जात हिंदु महार) रा. बौद्ध वसाहत आरग ता. मिरज जि.सांगली फिर्याद दिली.

याबाबतअधिक माहिती अशी की, काल शुक्रवार (ता.२८) रोजी सांयकाळी ५:३० वा चे सुमारास फिर्यादी पृथ्वीराज आरग येथील नायरा पेट्रोलपंपावर असताना पृथ्वीराज यांचा चुलत भाऊ दिशांत अजित कांबळे, यांचेसोबत आरग गावातील प्रमोद संदिप नाईक हा व त्याचे सात ते आठ मित्र वाद घालुन व भांडण करित होते. दिशांत जावुन काय झाले आहे असे विचारले असता त्याने लड्डे पॉलिटेक्निकल कॉलेजचे बस मध्ये बसण्याच्या कारणावरुन वाद झाले आहे असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी प्रमोद नाईक यांस समजावुन सांगत असताना तो या महारच काय ऐकायच आहे, असे म्हणुन वाद घालत तुला बघुन घेतो म्हणुन तेथुन निघुन गेला. त्यानंतर फिर्यादी व त्याचा चुलत भाऊ दिशांत तेथुन घरी येवून घडला प्रकार फिर्यादीच्या चुलते अजित कांबळे यांना सांगितला. त्यावेळी चुलते अजीत कांबळे यांनी माजी सरपंच संदिप नाईक यांना फोन करून मुलाच्यात किरकोळ कारणावरुन वाद झालेला असुन तो आपण बसुन मिटटवूया असे सांगितले असता त्यांनी चुलते अजित कांबळे यांना फिर्यादीला घेवुन नायरा पेट्रोलपंप आरग येथे येण्यास सांगितले असता चुलत्याने तेथे खुप लोक जमा झाले आहेत तुम्ही समाज मंदिर जवळ या असे सांगितले. शुक्रवारी रात्री ८: ०० च्या सुमारास फिर्यादी व चुलते अजित कांबळे गौतम रघुनाथ कांबळे, प्रभाकर कांबळे, सुरेश कांबळे व संजय कांबळे असे समाजमंदिर जवळ असाताना गावातील संदिप नाईक, सदाशिव नाईक, दिलीप नाईक असे तेथे आले. सांयकाळी ५:३० वा नायरा पेट्रोलपंप येथे झालेला वाद मिटवत असताना संदिप नाईक यांने त्याचे मुलाला फिर्यादीने कानाखाली मारले असल्याने सगळ्या समोर फियादीच्या गालावर चापट मारली व प्रमोद नाईकनेही फिर्यादीच्या गालावर चापट मारली. त्यानंतर अचानकपणे गावातील विशाल शिंदे, राहुल माने, सुनिल नाईक, प्रमोद मोरे, अनिल नाईक, निखील नाईक, धनराज घोडके, शिवानंद पवार, प्रमोद नाईक, सागर बाबासो मोहिते असे तेथे आले. तेव्हा धनराज घोडके (हिंदु मराठा), विशाल शिंदे (हिंदु लोहार) हे तलवार घेवून, राहुल माने (हिंदु मराठा) कुन्डाड घेवून व सुनिल नाईक (हिंदु बेरड), प्रमोद मोरे (हिंदु मराठा), अनिल नाईक (हिंदु बेरड), निखील नाईक (हिंदु बेरड), शिवानंद पवार (हिंदु मराठों), सागर बाबासो मोहित (हिंदु बेलवार) लोकांच्या हातात लोखंडी रॉड घेवुन येवुन जातीवाचक शिवीगाळ करुन फिर्यादिस मारण्यासाठी अंगावर धावुन आले तेव्हा फिर्यादीचे चुलत भाऊ स्वराज विजय कांबळे, प्रशिक अशोक कांबळे, प्रशनजीत कविदास माने हे फिर्यादीला त्याच्यापासुन सोडवत असताना जातीवाचक शिवीगाळ करत तुम्हाला मस्ती आली आहे असे म्हणून फिर्यादी व मित्रांना लाथाबुज्यानी मारहाण करु लागले. कांबळे गट तेथून पळुन जात असताना नाईक गट मारण्यासाठी कांबळे गटाच्या गल्लीत घरांमध्ये जबरदस्तीने दरवाजे उघडून घरातील महिलांना सुद्धा धक्काबुक्की केली व आमचे वस्ती मध्ये दहशत करुन तेथुन निघुन गेले. याप्रकरणी पृथ्वीराज सुरेश कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत संदीप नाईक, प्रमोद नाईक, सदाशिव नाईक, धनराज घोडके, राहुल माने, सुनील नाईक, प्रमोद मोरे, अनिल नाईक, शिवानंद पवार, सागर मोहिते, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

याप्रकरणी पृथ्वीराज सुरेश कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत संदीप नाईक, प्रमोद नाईक, सदाशिव नाईक, धनराज घोडके, राहुल माने, सुनील नाईक, प्रमोद मोरे, अनिल नाईक, शिवानंद पवार, सागर मोहिते, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button