कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता. २९ : चारचाकीला दुचाकीने कट मारताना घासल्याच्या कारणावरून तिघांनाकडून पोलिसाला मारहाण करण्यात आलेची घटना गुरुवार (ता.२७) रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी कुपवाड पोलीसांत कुमार किसन रूपनर (साठेनगर, सांगली), अनिस यासिन मुजावर आणि पवन राजू पडळकर दिघेही (संजयनगर, सांगली) या तिघां संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. विकी जयपाल सावंत (वय ३८, रा. कापसे प्लॉट परिसर, कुपवाड, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांची अधिक महिती अशी की , गुरुवारी (ता. २७) रात्री फिर्यादी आपल्या चारचाकीने कुपवाड शहरातून कापसे प्लॉटच्या दिशने जात असताना जुन्या बुधगाव रोडवर चारचाकीस संशयित दुचाकीवाल्यांनी कट मारला असता, चारचाकीला दुचाकी घासल्याने फिर्यादीने गाडी व्यवस्थित चालवा असे तिघांना बोलले असता तिघांसंशयितांनी फिर्यादीला चारचाकीतून बाहेर ओढून मारहाण केली. त्यातील एकाने आईस्क्रीम गाड्यावरील काचेचा ग्लास फिर्यादीच्या डोक्यात घातला. मारहाणीत ते जखमी झाले. त्यांनी शुक्रवारी (ता. २८) प्रकाराबाबत कुपवाड कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.