विनोद तावडेंच्या भेटीने शरद पवार गटाला बसणार धक्का? राजकीय चर्चेला उधाण..

विनोद तावडे भाजप नेते यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. (ता. 28)ऑगस्टला सांगली जिल्ह्याच्या संघटनात्मक दौऱ्या निमित्त राष्ट्रीय महामंत्री श्री विनोद जी तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळावा संपन्न झाल्यानंतर विनोद तावडेंनी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बंद खोलीत राजकीय चर्चा झाल्याचे असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले की; माजी आमदार शिवाजीराव नाईक भाजपामध्ये प्रवेश करतील का? शरद पवार गटाला धक्का बसणार का? यापूर्वी नाईक भाजपात होते, पण महाविकास आघाडी सरकार काळात त्यांनी भाजपाला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.