
मिरज : मिरज मतदार संघात राजकीय भूकंप मिरज भाजप नेते मोहन वनखंडे सर यांचा काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश. या पक्ष प्रवेशमुळे मिरजेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. मिरजेतील आघामी विधानसभा लढत ही चुरशीची होणार असून आता मोहन वनखंडे सर आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यात लढत होणार.
मिरज विधानसभा क्षेत्राच्या उज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी कोल्हापूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मा. रमेशजी चेंनिथेला , माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण, विधानसभा विरोधीपक्ष नेते आ.विजयजी वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप नेते मोहन वनखंडे यांचा काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी मोहन वनखंडे बोलताना म्हणाले; भविष्यात सर्व वरिष्ठ नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघास समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध असेन .
यावेळी मा. आ. विश्वजीत कदम (बाळासाहेब),मा. खा. विशाल (दादा) पाटील, मा. आ. भाई जगताप,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. पृथ्वीराज (बाबा) पाटील,भारती सहकारी बँक चे संचालक मा. जितेश (भैय्या) कदम आदी उपस्थित होते .