कुपवाड | प्रतिनिधी
पोलीस ठाणे एमआयडीसी कुपवाड तर्फे जाहीर आवाहन

कुपवाड ता.२२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल शनिवार (ता.२३) रोजी जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांनी आवाहन केले आहे की; विधानसभा निकालानंतर कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे लावू नये, फटाके फोडू नये. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. सोशोल मिडियाचा माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या,जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार करू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक २२ ते दिनांक २३ या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin करून बदल करून घ्यावा, कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत.
वादग्रस्त पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणार्यावर व ग्रुप ॲडमिनवर कायदेशीर कारवाई करणार येणार असल्याचे सांगितले.