
मुंबई : महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. घवघवीत यशानंतर आता महायुतीच्या सत्ता-स्थापणेसाठी हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री कोण होणार? अजून ही कोणती अधिकृत माहीती आली नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत.
उद्या राज्यपालांच्या भेट घेणार आहे. त्यांच्या भेटीत एकनाथ शिंदे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे समजते. तर मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेची समजते.