
मंगसुळी ता .१/१२/२०२४ रविवार: आज अमावस्या असल्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातून भाविक खंडेरायचा दर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांगा बगायला मिळाल्या दर्शनासाठी अनेक भाविकानीं रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेतले तर अनेक भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात हे प्रसिद्ध असलेले खंडोबा देवस्थान आहे. खंडोबाचे हे देवस्थान कर्नाटकातील मंगसुळी या ठिकाणी आहे. महाराष्ट्र व कर्नाटकमधून अनेक भक्तगण आज दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. खंडोबा देवस्थानाच्या वतीने भक्तगणासाठी महाप्रसादाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आले होते. दर अमावस्याला अशी भाविकांची गर्दी पाहायला मिळते.