
सांगली, ता.२४ : शिवसेना सांगली जिल्हाअध्यक्ष महेंद्रसिंग चडाळे, बांधकाम कामगार जिल्हाअध्यक्ष शरद यमगर, ओबीसी व जिल्हाअध्यक्ष विक्रम चव्हाण, उपाध्यक्ष श्रीकांत यमगर, अण्णासाहेब देशमुख, राष्ट्रीय कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष यांच्याकडून मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे निवडी जाहीर करण्यात आले.
वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने मिरज तालुक्यात शिवसेना संघटन वाढविण्यासाठी वंचित शोषित घटकांना विविध सामाजिक उपक्रमातून पक्षांचा विचार प्रसार संघटनेच्या माध्यमातून करणार या हेतूने मिरज तालुका प्रमुख पदी परशुराम बनसोडे यांचे निवड करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा प्रमुख महेंद्रसिंग चंडाळे यांच्याकडून निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.