
सांगली, ता.२४: विलेपार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले गेले ह्या कृत्याविरोधात समस्त दक्षिण भारत जैन सभा व सकल जैन समाजाच्या वतीने आज सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये श्री. सिद्धार्थ सुधीरदादा गाडगीळ सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ह्या कृत्याच्या विरोधात निषेध नोंदवला. यावेळी सिद्धार्थ सुधीरदादा गाडगीळ, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार राजेंद्र अण्णा यड्रावकर, काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, दक्षिण भारत जैन सभा चे चेअरमन रावसाहेब पाटील, व्हाईस चेअरमन दत्ता डोरले, दक्षिण भारत जैन सभा चे मुख्यमहामंत्री अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार अरविंद मजलेकर, उद्योजक अभय जैन तसेच समस्त सकल जैन समाज व दक्षिण भारत जैन समाज तसेच दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
