विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास स्था. गु. अ. शाखेने केले अटक; एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त

सांगली : प्रतिनिधी

विना परवाना देशी बनावटीची पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास अटक; एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त.

सांगली, ता. २४ : कुंडल येथे विना परवाना देशी बनावटीची पिस्टल बाळगणाऱ्या एकास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केले. कुमार जगनाथ खेत्री, वय ३१ वर्षे, रा. ताकारी, ता वाळवा, जि सांगली, असे अटक केलेले तरुणाचे नाव आहे. कुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुसे सांगली स्था. गु. अ. शाखेने हस्तगत केले. याबाबत कुमारवर कुंडल पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांची अधिक माहिती अशी की, विना परवाना अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याचावर करवाईचे आदेश सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले. दिलेल्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी त्यांच्या स्टाफमधील एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोह/महादेव नागणे व पोह/संदिप गुरव यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुमार खेत्री, रा. ताकारी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार बिगरपरवाना अग्निशस्त्र बाळगून कुंडल फाटा ते किर्लोस्करवाडी रोडला फिरत आहे. मिळाले बातमीप्रमाणे वरील पथक सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव कुमार जगनाथ खेत्री असे सांगितले. त्याचे अंगझडती घेतली असता, त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस व रोख रक्कम मिळून आली. याबाबत त्याच्याकडे परवाना विचारले असता त्याचेकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याने त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुध्द पोशि/ विनायक सुतार यांनी कुंडल पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर पलूस, इस्लामपूर, श्रीरामपूर (आहिल्यानगर) व भूईज (सातारा) पोलीस ठाणेस आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक तपास कुंडल पोलीस ठाणे करीत आहेत.

याबाबत कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा.अपर पोलिस अधीक्षक रितु खोखर, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, पोहेकों / महादेव नागणे, संदिप गुरव, सागर लवटे, मछिद्र बर्डे, सतिश माने, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, अमर नरळे, दऱ्याप्पा बंडगर, नागेश खरात, उदय माळी, संदिप नलावडे पोशि/ विनायक सुतार, केरबा चव्हाण, विक्रम खोत आदी.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button