
सांगली: महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून एका गरीब पैलवानाला लोकसभा निवडणुकीत उभे केले. ऐनवेळी माजी मंत्री असलेल्या आघाडीच्याच एका आमदाराने पैलवानाऐवजी बंडखोर उमेदवाराचा छुपा प्रचार केला, असा आरोप भाजपचे खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.पाटील म्हणाले की, निवडणुकीत उमेदवाराला फसविण्याचा उद्योग जसा महाविकास आघाडीत झाला तसा तो भाजपमध्येही झाला. सांगली लोकसभा मतदारसंघात आमच्याच पक्षातील काही लोकांनी सोबत असल्याचे भासवून दगाफटका केला. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची कृती उजेडात आली आहे. पक्ष निश्चित त्यांच्यावर कारवाई करेल. मात्र, पक्षात ज्यांनी विश्वासघाताचे राजकारण केले त्यांच्याशी तशाच पद्धतीने वागण्याची माझी भूमिका राहणार आहे.पक्षात काही लोकांनी विरोधात काम केल्यामुळे मताधिक्य घटणार, हे निश्चित आहे. पूर्वी अडीच लाखांच्या मताधिक्याचा दावा मी केला होता. आता लाखाचे मताधिक्य मिळेल, असे वाटते.