
मुबंई – घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्यांनी एक ट्वीटद्वारे ट्वीट करत , उद्धव ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत.की, “घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंगची वार्षिक कमाई ५० कोटी, मग मातोश्री आणि भांडुप चा हिस्सा किती?
पेट्रोल पंप आणि होर्डींगची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलीस हौसिंगची आहे. २०२०-२०२१ मधे उद्धव ठाकरे सरकार असताना बैकायदेशीर पणे LORD’S MARK INDUSTRIES LTD. या खाजगी कंपनीला दिले. आणि त्या जागेवर होर्डिंग लावन्यासाठी भावेश भिंडे यांचा मे. इगो मीडीया प्रा. लि. कंपनीला दिलं. पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई २५ कोटी असून होर्डिंगची वार्षिक कमाई २५ कोटी आहे त्यातून या ५० कोटीतून भांडुप ला किती? व मातोश्रीला किती जातात हा हिशेब संजय राऊत यांना द्यावा लागणार.
घाटकोपर पेट्रोल पंप व होर्डिंग ची जागा महाराष्ट्र सरकार पोलिस हौसिंगची ची आहे असे किरीट सोमय्यांनी आरोप केला