
लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या आरोपांच्या झाडी एकमेकांवर करताना पहायला मिळाल्या. दरम्यान आता निवडणूक संपल्यावरही या आरोपांच्या फेऱ्या संपण्याचे नाव घेत नाहीत. मावळत्या खासदारांनी धमक्या दिल्या म्हणून घाबरु नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास अपक्ष उमेदवार विशालदादा पाटलांनी आपल्या समर्थकांना दिला. कालच्या पत्रकार परिषदेत संजयकाका यांनी जे विरोधात गेले त्यांचा ४ जून नंतर व्याजासाहित हिशोब चुकता करतो, असे टीकास्त्र सोडले होते. या वक्तव्यानंतर आज अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना कालच्या संजयकाकांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत मावळत्या खासदारांनी धमक्या दिल्या तर घाबरु नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास आपल्या समर्थकांना दिला आहे.माझा दोस्तच दिलदार आहे.त्यामुळे मला शत्रू कडे बघावे लागत नाही.माझे दिलदार मित्र माझा मदतीला आला हे तुमाला ४तारखेला दिसेल, आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पस्टपणे सांगितले आहे. आमची ही एकी मला दिल्लीला घेऊन जाईल..४ तारखेला विशाल पाटील निवडुन येणार आहे लहान सहान नाही तर दोन लाखाचा आधिक्य मताने निवडुन येणार या जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात आघाडी घेणार तासगाव तालुक्यात सुधा मी संजय काका पेक्षा एक मत जास्त घेणार .