
कुपवाड : देशी बनावटीचे बेकायदेशीर पिस्तूलविक्रीस आलेल्या युवकाला कुपवाड पोलिसांनी केले जेरबंद. पोलिसांनी संशयितांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस असा 50 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कराड तालुक्यातील जुळेवाडी येथील मनोज राजेंद्र खांडेकर (वय 25) याला कुपवाड औद्योगिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिपक भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाढवे, दऱ्याप्पा खोत, राजेंद्र नलवडे, जितेंद्र जाधव, शिवानंद गवाणे शेळकंदे, नामदेव कमलाकर, आप्पासो नरुटे, निलेश कोळेकर, संजय पाटील, सुरेखा कुंभार, अरुणा यादव, सुधीर गोरे, सचिन कनप, मधुकर सरगर विकास जाधव, दत्ता यमगर, रेखा सरगर, शकीरा मुल्ला आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करणेत आले.
या पथकाला सूतगिरणीजवळील शारदा हॉस्पिटलजवळ एकजण पिस्तूलची बेकायदा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी सापळा लावला. आज (शनिवार) दुपारी चारच्या सुमारास सूतगिरणी ठिकाणी आले. यावेळी पथकाने झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस व 100 रु. रोख रक्कम आढळून आले. या घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.