
कुपवाड : कृष्णा व्हॅली चेंबर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीझ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जी.एस.टी,आय.टी.सी आणि ए.आय. या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे संचालक रमेश आरवाडे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सतीश जोशी, सदर कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रणिता शिंदे उपस्थित होत्या.
प्रणिता शिंदे बोलताना म्हणाल्या की, जी.एस.टी. मध्ये आय.टी.सी. चे पालन करण्यासाठी अग्रीमेंट, दस्तऐवजीकरण, स्टाफ प्रशिक्षण, पझेशन असणे अंत्यत गरजेचे आहे. तसेच ब्लॉक केलेले क्रेडिट्स,अपात्र क्रेडिट्स आणि क्रेडिट रिव्हर्सल्सवर विशिष्ट लक्ष केंद्रित करून जी.एस.टी. अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट्सच्या तरतुदी, विविध आय.टी.सी. सामंजस्य आणि त्या दिशेने करावयाच्या कृती करण्याची व्यावहारिक पद्धत, आयटीसी प्लॅनिंगद्वारे व्यवसायात खर्च नियंत्रण आणि मूल्यवर्धनासाठीच्या टिप्स, विभागीय लेखापरीक्षण, तपास, छाननी, मूल्यांकन इत्यादी अंतर्गत येणाऱ्या आय.टी.सी. समस्यांना सामोरे कसे जाणे, सर्वोत्कृष्ट उद्योग पद्धती, आयटी टूल्स, ऑटोमेशनची व्याप्ती, सिस्टीम आणि रिपोर्टिंगमध्ये पाळल्या जाणाऱ्या प्रक्रिया याबाबतची पूर्ण विश्लेषणात्मक माहिती त्यांनी कार्यशाळेमध्ये उपस्थित उद्योजक तसेच विविध कंपन्याचे प्रमुख यांना दिली.
यावेळी, उद्योजक अजित चिमड, अशोक दिपू, रचना चिप्प्लकट्टी, प्रवीण माळगे, उपेन पटेल, उमेदच्या प्रिया चिनीवाल,चंदन पाटील, शाह प्रेसिकास्तचे संजय जाधव, सह्याद्री स्टार्चचे रोहित कुडचे, राज कास्टिंगचे रियाज कमीरकर, चिंचवाडे असोसिएटचे निवृत्ती तांदळे, प्रोकेअर क्रॉप सायन्सचे समर्थ नलवडे, विजेता स्विच गेअरचे प्रवीण माळी, चेंबरचे व्यवस्थापक अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
