खटाव गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाची चौकशी सुरू.

मिरज तालुक्यातील खटाव गावात सुरू असलेल्या सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीकडे लेखी निवेदन देऊन तक्रार दिली होती. निवेदनाच्या तक्रारीवरून आज खटाव गावात चौकशी कमिटी दाखल झालेली आहे. सदर प्रकरणी चौकशी सुरू आहे. खटाव गावात सुरू असलेल्या कामाबाबत शोषखड्डा सुका-ओला कचरा, सुपीक ट्रॅक्टर खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित झाले आहे.
सदरचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर ठिकाणी घातलेले पाईपलाईन हे वरच्यावर मुजवून बिले काढण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी शोषखड्डा बांधले आहेत; त्या ठिकाणी भविष्यात काहीही उपयोग होणार नसल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी शोषखड्डे हे एमडीआर रस्त्यावरच बांधलेले आहेत.
ट्रॅक्टरची खरेदी 2023 मध्ये करण्यात आले होते. तेच ट्रॅक्टर आता 2024 मध्ये खरेदी केल्याचे दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची अधिकारी यांना घातलेले पाईपलाईन हे हाताने उकरून दाखवण्यात आले आहे.
त्यामुळे सदर प्रकरणाची वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. बिल अदा न करण्याची मागणी करण्यात आली आहे.