मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये बौद्ध व मातंग समाजाला महाविकास आघाडीतून उमेदवारी देण्यात यावी.

मिरज : आज सुभाषनगर येथे सोनाई हॉलमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील बौद्ध व मातंग समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने मिरज मतदारसंघ हा 2009 मध्ये राखीव झाला होता, त्यामध्ये बौद्ध व मातंग समाजाची मतदानाची टक्केवारी ही जास्त होती त्यामुळे हा मिरज मतदारसंघ राखीव झाला होता. तेव्हापासून मिरज मतदार संघात बौद्ध व मातंग समाजातील उमेदवारांना प्रतिनिधीत्व देण्यात आले नाही. त्यामुळे आजच्या झालेल्या बैठकीत चर्चा होऊन महाविकास आघाडीने बौद्ध व मातंग समाजाला उमेदवारी देण्यात यावी.
यासाठी मिरज ग्रामीण भागातील आजी माझी सरपंच, उपसरपंच, सदस्य,जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित होते.या बैठकीमध्ये पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींना भेटून निवेदन देऊन उमेदवारांची मागणी करण्यात येणार आहे.
या बैठकीस बी.के .कांबळे माजी सभापती पंचायत समिती मिरज, माजी सरपंच अरुण कांबळे, सोनीचे माजी उपसरपंच श्यामजी ढोबळे ,प्रमोद इनामदार, सचिन दादा कांबळे ,आरग माजी उपसरपंच अजित कांबळे, सोनीचे माजी उपसरपंच दीपक कांबळे , मालगावचे विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर, एरंडोली च्या सरपंच वासंती ताई धेंडे सागर कांबळे, विनोद कांबळे, ऑगस्ट कोरे ,सतीश खाडे, सागर आवळे ,प्रदीप वाघमारे, स्वप्निल बनसोडे हनुमंत कांबळे ,सागर आठवले, कविष कांबळे, रणजित कांबळे ,प्रमोद वाघमारे ,राकेश वाघमारे,इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.