सांगली | प्रतिनिधी |

सांगली : पलूस परिसरात शुक्रवार दि.२५/१०/२०२४ रोजी विना परवाना देशी बनावटीची पिस्तुल बाळगणाऱ्या इसमास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून त्याचा कब्जातील एक देशी बनावटीची पिस्तुल, एक जिवंत कडतुस व रोख रक्कम ३०० रुपये असा एकूण ५० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा २०२४ ची निवडणुक आदर्श आचारसंहिता लागु झालेली असुन त्या अनुषंगाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले आहेत. त्या सुचनेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून दि. २५.१०.२०२४ रोजी पोहवा / दरीबा बंडगर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित आरोपी विशाल धेंडे हा अवैध गावठी पिस्तुल बाळगुन बांबवडे फाटा, पलुस परिसरात येणार आहे. त्याबातमीने बांबवडे फाटा, पलुस येथे सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याचे नाव विशाल माणिक धेंडे, (वय २७ वर्षे, पत्ता धुळगांव, ता. तासगांव जि. सांगली) असे सांगितले. त्याची अंगझडतीचा घेतली असता, त्याचेकडे एक जिवंत काडतुस व ३०० रुपये रोख तसेच एक देशी बनावटीचे पिस्तुल हस्तगत केले. याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना त्याचेकडे नसल्याचे पलुस, पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पलुस, पोलीस ठाणे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, पोहवा / दरीबा बंडगर, नागेश खरात, सागर लवटे, सागर टिंगरे, संदिप गुरव, अनिल कोळेकर, सतिश माने, पोना संदीव नलवडे, विक्रम खोत, अभिजित ठाणेकर, गणेश शिंदे यांनी केली आहे.