मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

लिंगनूर गावचे सुपुत्र शशिकांत बनसोडे यांनी मिरज मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
मिरज मतदारसंघात भीमशक्ती संघटनेचे शशिकांत बनसोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मिरज मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे मिरज मतदारसंघात मला अपक्ष म्हणून निवडून दिल्यास मिरज मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याची माहिती शिका शशिकांत बनसोडे यांनी दिली आहे.
मिरज मतदारसंघ हा मागासवर्गीय राखीव असताना देखील बौद्ध समाजाला उमेदवारी डावण्यात आली आहे त्यामुळे मला निवडून दिल्यास सर्व बौद्ध बांधवांचे प्रश्न सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी बाळासाहेब भंडारे मिरज पंचायत समिती माजी सदस्य, भीमशक्ती संघटनेचे नेते सांगली जिल्हाध्यक्ष मोहन खरात, प्रशांत माळी माजी सरपंच मालगाव, जयश्री बनसोडे, माजी सरपंच लिंगनुर गौतम बनसोडे, कुमार बनसोडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम बनसोडे, शिक्षक संघटनेचे सचिव पोपट बनसोडे, रामचंद्र खांडेकर, मालगाव बाळासाहेब कांबळे, कळंबी रणदिवे कांबळे, भीमशक्ती शहराध्यक्ष मिरज लिंगणुर गावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.