मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज

मिरज मतदारसंघात सुरेश भाऊ खाडे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीत आमदार मा.ना.सुरेश भाऊ खाडे यांचा विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी बोलताना म्हणाले की; मिरज मतदार संघात सुरेश भाऊ खाडे यांचा विजय निश्चित आहे.
मिरज मतदार संघात पंधरा वर्षापासून आमदार म्हणून जनतेची सेवा केली आहे. मिरज मतदार संघात अनेक विकास कामे केले आहेत त्यामुळे जनता सुज्ञ असून कोणत्याही भूलतपाला बळी न पडता जनता मलाच निवडून देईल असा ठाम विश्वास सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला.
कामगार मंत्री झाल्यावर मिरज मतदारसंघात विशेषता अनेक प्रश्न अनेक कामे मार्गी लागले आहेत त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे गुलाल आमचाच असणार आहे असा ठाम विश्वास सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला आहे.