मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज मतदार संघातील भीमशक्ती संघटनेचे उमेदवार लिंगनूर गावचे सुपुत्र शशिकांत बनसोडे यांनी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांची घेतली भेट.
याप्रकरणी मिळाले अधिक माहिती अशी की खासदार भीमशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे साहेबांनी मिरज मतदार संघा बाबत चर्चा करून भेटी घेण्याचे सूचना देण्यात आले होते.
मिरज मतदार संघात बौद्ध मतदारांची संख्या ही ५० हजार इतकी असून सुद्धा बौद्ध समाजाला काँग्रेसकडून उमेदवारी दिली नाही यासंदर्भात आज विश्वजीत कदम यांची भेट घेऊन मिरज मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली व काँग्रेसकडून पाठिंबा बाबत मागणी करण्यात आली आहे. मिरज मतदार संघात भीमशक्ती उमेदवारास पाठिंबा देण्याचे मागणी करण्यात आले आहे. याबाबत विश्वजीत कदम जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील यांच्यासह काँग्रेसच्या दिगज नेत्यांचे भेट घेऊन मिरज मतदार संघाबाबत चर्चा करण्यात आले आहे.
अशी माहिती भीमशक्ती संघटनेचे मिरज मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत बनसोडे यांनी दिली आहे. जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ माने भीमशक्तीचे नेते बाळासाहेब भंडारे उपस्थितीत भेट घेण्यात आली.