कुपवाडच्या आढावा बैठकीत महाविकास आघाडीचे पृथ्वीराज बाबांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा कुपवडकरांचा निर्धार

कुपवाड | प्रतिनिधी

सांगली दि.८: कुपवाडमध्ये अकुज क्रीडांगणावर महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.पृथ्वीराज बाबा पाटील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या प्रचार नियोजन कामकाज आढावा/संवाद बैठक संपन्न झाली त्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा कुपवडकरांनी केला निर्धार.

स्वागत व प्रास्ताविक कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोतरे यांनी केले. अय्याज नायकवडी, शेडजी मोहिते, विजय घाडगे,मुस्ताक रंगरेज, किरण सुर्यवंशी, बजरंगभाऊ पाटील, प्रियांका विचारे,आयनुद्दीन मुजावर, फैजल पटेल यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याचे सांगितले.



यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘माझ्या कामाची दखल घेऊन मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील नेते महाविकास आघाडी सत्तेवर आणण्यासाठी परिश्रम करत आहेत. आपण सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घर टू घर संपर्क करुन जास्तीत जास्त मतदान आपल्याला होईल असे पहावे.

निवडून आल्यानंतर आपला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करीन. जातीयवादी महायुती सरकारला खाली खेचण्याची हीच वेळ आहे. बेरोजगारी व महागाईने जनता त्रस्त झाली आहे. बदल हवा आहे. आमदार गाडगीळ यांनी दहा वर्षे कांहीच केले नाही. त्यांचा पराभव करण्यासाठी एकसंधपणे लढू या. कार्यकर्ते ही माझी खरी ताकद आहे. मला आमदार म्हणून हुकलेली संधी द्या.सांगली स्मार्ट सिटी करण्यासाठी मी सर्व शक्तीनिशी काम करणार आहे.

पृथ्वीराज पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बजरंगभाऊ पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अय्याजभाई नायकवडी, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव भाऊ मगदूम, किरण सुर्यवंशी, विजय घाडगे, मुस्ताकभाई रंगरेज, सनी धोतरे, आयनुद्दीन मुजावर, रुपेश मोकाशी, तानाजी गडदे, बाळासाहेब मंगसुळे, अख्तरभाई मुजावर, महावीर खोत, समीर मुजावर, राहूल पाटील , अमोल कदम, प्रकाश व्हणकडे, दिलीप धोतरे, सुरेश साखळकर, विठ्ठल संकपाळ, प्रियांका विचारे, कुंभार मॅडम, भारती व दिक्षितकुमार महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे कार्यकर्त्य व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button