सांगली | प्रतिनिधी
महायुतीची विजय निर्धार सभा..!

सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार सुधीदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदी आणि फडणवीस यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा सांगितला.

प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सुरू होत असलेले 70 हजार करोड रुपयांचे एशियामधील सर्वात मोठे ड्रायपोर्ड तयार होत आहे यासोबतच सांगलीमध्ये लवकरच विमानतळ सुरू होऊन यामध्ये दिल्ली बेंगलोर चेन्नई मुंबई या मार्गावरील सोयीनुक्त विमान सेवा प्रस्थापित होत आहे. पुणे-कोल्हापूर- मिरज – हुबळी ही सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस, पुणे मिरज ही रेल लाईन इलेक्ट्रिफिकेशन अशा अनेक यशस्वी कामांचे उल्लेखन केले.
अमित शहा केंद्रीय गृहमंत्री
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीची बांधिलकी आणि विकासाचा संकल्प केला. आगामी निवडणुकीत मतदारांचा पाठिंबा मिळवून प्रगतीचा एक नवा अध्याय सुरू करण्यास सांगली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आणण्याचे सांगितले.