माधवनगर | प्रतिनिधी

माधवनागर : सांगली भाजपा नेते व माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष श्री शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी महायुतीचे भाजपाचे सांगली विधानसभाचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ यांना पाठिंबा दिला.
महायुतीचे उमेदवार म्हणून विजयी करण्याकरिता माधवनगर आणि परिसरातून विक्रमी मताधिक्य देईन अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी माधव नगर येथील प्रचारादरम्यान दिली.
यावर सुधीरदादा म्हणाले मी केलेल्या विकास कामांची तेथील जनतेच्या आत्मीयतेने मला पोहोच पावती दिली.
यावेळी पप्पू डोंगरे यांचे समर्थक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.