कुपवाड | प्रतिनिधी

सांगली : महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार मा.पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या घर टू घर प्रचाराची सुरवात आज कुपवाड गावचे ग्रामदैवत हजरत लाडले मशायख र.अ यांचा आशीर्वाद घेऊन माजी नगरसेवक पै.मंगेश चव्हाण, नगरसेवक शेडजी मोहिते, मुस्ताक रंगरेज, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, दर्गा सरपंच आयनुद्दीन मुजावर, कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोतरे, राष्ट्रवादी कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढून करण्यात आला.
यावेळी (उबठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम बोलताना म्हणाले कोणत्याही परिस्थिती मध्ये सांगलीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील आणि मिरज मध्ये तानाजी सातपुते यांना मोठया मताधिक्याने निवडून आणायचे आहे. कोणीही गाफील न राहता घर टू घर प्रचार करून लोकांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
तर माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीरा बाबा पाटील यांचा एकत्रितपणे प्रचार करून निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. दर्गा सरपंच आयनुद्दीन मुजावर म्हणाले, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या सोबत मुस्लिम समाज ताकदीने सोबत आहे. महाविकास आघाडीच्या सांगली आणि मिरज या दोन्ही उमेदवारांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते साहेबुद्दीन मुजावर म्हणाले, मुस्लिम समाज हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिला आहे,आणि इथून पुढे ही काँग्रेस पक्षाच्या सोबत राहील,काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना “हात” या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करूया असे आवाहन केले.

कुपवाड दर्गा मधून प्रचाराची सुरवात करून तराळ गल्ली, मेन रोड, जमदाडे गल्ली, जैन गल्ली, कुपवाड चावडी, सिद्धार्थनगर, रानाप्रताप चौक, महावीर व्यायाम शाळा, मेन रोड सोसायटी, बस स्टँड,कुपवाड दर्गा पर्यंत या मार्गावरून घर टू घर प्रचार फेरी करण्यात आली. प्रचार दरम्यान नागरिकांचा,महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. लोक नक्कीच पृथ्वीराज बाबा पाटील यांना निवडून देतील यात शंका नाही..