मिरज | प्रतिनिधी

मिरज : खटाव बौद्ध समाजाचे ४०० इतकी मतदान असून डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
मिरज तालुक्यातील खटाव गावात आज डॉक्टर महेश कुमार कांबळे यांना संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तमन्ना कांबळे भाऊसो नाईक पत्रकार परशुराम बनसोडे यांच्याकडून आज पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
खटाव तालुका मिरज येथे आज बौद्ध समाजाच्या वतीने बौद्ध समाज मंदिर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे हे बौद्ध समाजाचे एकमेव उमेदवार असून बौद्ध समाजाचे मिरज मतदार संघात ४५ हजार इतकी मतदार आहेत त्यामुळे आंबेडकर चळवळीचे नेते बौद्ध समाजाच्या मदतीला धावून येणारे एकमेव नेते असून मिरज मतदार संघाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांना पतंग या चिन्हावर बटन दाबून विजयी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
बौद्ध समाजाचे नेतृत्व करणारे पत्रकार परशुराम बनसोडे हनुमंत कांबळे श्याम कांबळे कल्लाप्पा कांबळे माझी ग्रामपंचायत सदस्य तमन्ना कांबळे मिथुन कांबळे किरण कांबळे राहुल कांबळे सुरेश कांबळे मानतेस कांबळे भाऊसाहेब नाईक शिवाजी वडर रमेश जयनावर परशुराम कांबळे आप्पासो कांबळे विठ्ठल कांबळे रवी कांबळे सचिन कांबळे मिथुन कांबळे इत्यादी कार्यकर्ते मोठे संख्येत उपस्थित होते.