मिरज : प्रतिनिधी

सांगली, ता.२७ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ यात्रेची मिरजमध्ये जोरदार स्वागत व शक्तिप्रदर्शनाने मिरवणूक काढण्यात आले. महाराष्ट्र गौरव रथ – सांगली जिल्हा व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जयसिंगपूर येथे संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. आज रविवार सकाळी आमदर इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवाहर हायस्कूल मिरज येथून प्रस्थान केले.
यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण साहेब पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. (छ. शिवाजी महाराज मार्ग) हजरत मीरा साहेब दर्गा, मिरज येथेही भेट देण्यात आली. पुढे लक्ष्मी मार्केट मिरज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास, मिरज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर चौक येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. विष्णू माने, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी, सांगली शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, कार्याध्यक्ष बागवान, अतहर नायकवडी महिला शहराध्यक्ष राधिका हारगे, मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे, हर्षल सावंत, शंकरबापू गायकवाड, तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे, राजू शेख, अमित सन्नके, सौ.सुवर्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक अतहर इद्रिस नायकवडी यांनी केले.