
सांगली, ता.२७ : तासगाव कवठेएकंद येथे मिरासो बाबासो तांबोळी, वय ६२ वर्षे, रा. कवठेएकंद, ता. तासगाव या वृद्धाचा गुरुवार (ता.२४) रोजी खून करून आपघाताचा बनाव करणाऱ्याच्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या. सुभाण उस्मानगणी तांबोळी, वय २३ वर्षे, रा. कवठेएकंद, ता. तासगाव असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत सुभाणवर (ता.२६) तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून विजय नामदेव गस्ते पोलीस नाईक तासगाव पोलीस यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, गुरुवार (ता.२४) रोजी तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील कवठेएकंद येथील मिरासो बाबासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने त्यांचे डोकीस मार लागल्याने त्यांना उपचारास ग्रामीण रूग्णालय, तासगाव येथे दाखल केले असता ते उपचारा दरम्यान मयत झाल्याने तासगाव पोलीस ठाणेत कळीविले.
मयत मिरासो तांबोळी यांचे मरणाबाबत साशंकता आसल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करणेबाबत आदेश दिले होते.
त्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करणेबाबत सुचना दिल्या. त्या अनुशंगाने सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोह/सागर टिंगरे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कवठेएकंद येथील मयत मिरासो बाबासो तांबोळी हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने डोकीस मार लागून मयत झाले नसून त्यांचा पुतण्या सुभाण तांबोळी याने त्यांचे डोक्यात काहीतरी मारून त्यांचा खून केला असुन अपघाताचा बनाव केला आहे. नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे संशयित इसम सुभाण उस्मानगणी तांबोळी, वय २३ वर्षे, रा कवठेएकंद, ता.तासगाव याची गोपनीय माहिती काढून त्याचे हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेऊन मयत बाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याचा काका मिरासो बाबासो तांबोळी हे त्यास व त्याचे आई वडिलांना नेहमी शिवीगाळ करायचे. गुरुवार दि. २४/०४/२५ रोजी मिरासो तांबोळी सुभाणच्या वडिलांना शिवीगाळ करीत असल्याचे राग आल्याने मिरासोला हाताने मारहाण करून खाली पाडून रागाचे भरात जवळच असलेली चिनी मातीची बरणी त्यांच्या डोक्यात घालून त्यांचा खून केला होता.
त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने काका मिरासो तांबोळी हे जिन्यावरून बरणी घेऊन येत असताना पाय घसरल्याने जिन्यावरून पडून डोक्यास मार लागला असल्याचा बनाव तयार केलेबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपी यास पुढील तपास कामी तासगाय पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे मा. अपर पोलिस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गू. अ. शाखा, सांगली पोहेकों / सागर टिंगरे, द-याप्पा बंडगर, सागर लवटे, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतिश माने, संदिप गुरव, अमर नरळे, मछिंद्र बर्डे, महादेव नागणे, पोना/ उदय माळी, संदिप नलावडे पोशि/ विक्रम खोत आदी