कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता.२७ : औद्योगिक वसाहतीतील एका वर्कशॉप मध्ये ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना एकाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.२७) रोजी घडली. जितेंद्र तायप्पा सूर्यवंशी वय ५५ वर्ष रा. रोहिदास गल्ली, कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली असे शॉक लागून मयत झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, रविवार (ता.२७) रोजी साडे पाचच्या पूर्वी सुप्रीम पाईप कंपनी जवळ, दत्तनगर येथील अतुल देविदास सावंत यांचे ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करीत असताना वर्कशॉप मध्ये इलेक्ट्रिक शॉक लागला. इलेक्ट्रिक शॉकने बेशुध्द अवस्थेत असलेल्या जितेंद्रला त्याचे नातेवाईक धर्मेंद्र सुभाष सूर्यवंशी उपचारास शासकीय रुग्णालय मिरज येथे दाखल केले असता वैधकीय अधिकारी तपासून उपचारापूर्वी सायंकाळी साडेसहा वाजता मयत घोषित केले आहे. याबाबत CMO डॉ. निलेश कासार शासकीय रुग्णालय मिरज यांनी दिली. याबाबत अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.