मिरज | प्रतिनिधी

मिरज ता. २६ : बेडग मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा. भीम प्रेरणा मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयामध्ये ‘महाराष्ट्र’ या चॅनलचे संपादक मा. मल्हारी ओमासे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राध्यापक सुखदेव आकाराम कांबळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण सरोदे यांनी संविधान प्रास्ताविका वाचून उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीत कांबळे, सचिव वर्षा शिंदे, सदस्य राधा कांबळे, कैलास कांबळे, श्रीकांत कोळी, धनश्री कोळी, हनुमंत जगताप, साहिल कांबळे, सचिन शिंदे, कैलास भोसले, प्रज्योत कांबळे, नरवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सपकाळ इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.