
भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपला मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार, हे निश्चित झालेय. पण जी महत्त्वाची खाती आहेत ते कोण घेणार? कुणाच्या पदरी मलाईदार खाती येणार? याचं उत्तर आवग्या ७२ तासांत मिळेलच. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाला सर्वाधिक मंत्रिपदे मिळणार आहेत. तर भाजप गृहमंत्रालय आपल्याकडेच ठेवणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रावादीकडे अर्थ खाते जाणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते राहण्याची शक्यता आहे.
पाहूयात कुणाकडे कोणती खाती राहू शकतात, संभाव्य यादी
- भाजपकडे कोणती खाती ?
- मुख्यमंत्री
- गृहमंत्री
- सामाजिक बांधकाम
- जलसंपदा
- वैदकीय
- वने
- आरोग्य
- उच्चशिक्षण
- उर्जा
- सहकार
- शिवसेनेला कोणती खाती जाणार? –
- नगरविकास
- एमएसआरडीसी
- पाणीपुरवठा
- उदयोगआदिवासी
- अजित पवारांकडे कोणती खाती ?
- अर्थमंत्रालय
- महसूल
- कृषी
- ग्रामविकास
- महिला बालविकास