सांगली | प्रतिनिधी

लग्न सोहळा आटपून परतताना काळाचा घाला तीन ठार, तीन जखमी. गाडी जयसिंगपूर हून सांगलीकडे येत असताना अंकलीच्या पुलावर गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटलाने भरधाव वेगात असणारी गाडी थेट नदी पात्रात कोसळली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी आहेत. या अपघातात मृतांची नावे प्रसाद भलचांद्र खेडेकर 40, प्रेरणा प्रसाद खेडेकर 35, वैष्णवी संतोष नार्वेकर 23 हे असून यात जखमी झालेली साक्षी संतोष नार्वेकर 42, वरद संतोष नार्वेकर 21 आणि समरजित प्रसाद खेडेकर या 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे. हा आपघात रात्री एकच्या सुमारास झाला आहे. हे सर्व सांगली आकाशवानी केंद्रामागे गंगाधर नगर येथील रहिवाशी आहेत.