कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड ता ३० : कुपवाड शहरातील ट्रिमिक्स रस्ताचे काम सुरू आहे. या रस्ताच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी होते. शुक्रवार (ता. २९) रोजी वाहतूक कोंडी होऊन एका युवकाच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने युवक गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती आयुष हेल्पलाइन टीमला मिळाली असता, आयुष हेल्पलाईन टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले पण वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका घटनास्थळी नेता येत नसल्याने दुचाकीवर त्या युवकाला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले.
यावेळी आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील , संचालक रितेश शेठ ,महावीर पाटील आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार, रुद्र प्रताप कारंडे, नरेश पाटील, सुरज शेख, चिंतामणी पवार हे मदतीसाठी आदी उपस्थित होते.