कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड ता.३०: कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोन युवकांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्या कब्जातील दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आले. याबाबत कुपवाड पोलिसांत (ता.२९) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा नोंद केलेल्या आरोपीचे नावे १) उमर समीर शेख (वय २४ वर्ष,धंदा मजुरी,रा.बजरंग नगर,रॉयल सिटी चौक जवळ, कुपवाड २) सुमित विनोद शिंदे (वय १९ वर्ष, धंदा मजुरी, रा. रत्नाबार जवळ, विश्रामबाग सांगली) असे आहे.
कुपवाड पोलिसांच्या अधिक माहितीनुसार सांगली जिल्हा हद्दीत ता. २०/११/२०२४ पासून ते ४/१२/२०२४ जमाव बंदी व जिवितास शारीरिक इजा पोहचविणारे कोणतेही शस्त्र साठे किंवा हत्यारे बाळगणे बंदी असताना, सदर आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोघे धारदार शस्त्रासोबत फिरत असल्याचे दिसून आल्याने कुपवाड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोहेको/ प्रदीप भोसले करीत आहे.