
सांगली : कवलापूर -तासगाव रोड कुमठे फाटा येथे ता. ११ दुचाकी आणि प्रवासी वडाप करणारी जीप यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या भीषण आपघातात दुचाकीस्वार यांची पत्नी दिपाली व दोन चिमुकली बालके जागीच ठार झाले तर दुचाकीस्वार पती विश्वास दादासो म्हारगुडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या अपघातात पत्नी दिपाली विश्वास म्हारगुडे (वय २७ वर्ष), सार्थक म्हारगुडे (वय ७ वर्ष), राजकुमार म्हारगुडे, वय ५ वर्ष रा. आंबा चौक संजयनगर असे मृत झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.
पोलिसांच्या अधिक माहिती असे की, तळेवाडी येथील एका गावात विश्वासच्या नातलगाचे लग्न होते. विश्वास त्याची पत्नी व दोन मुलासह MH 10 AH 8732 या दुचाकीने सांगली हुन तासगाव मार्गे गावी निघाला होता. कुमठे फाटे जवळील एक पेट्रोल पंपाजवळ प्रवाशी वडाप करणारी जीप MH 10 K 0495 या वाहनांने ओव्हरटेकच्या नादात जीप रस्ताच्या विरुध्द बाजूस घेऊन समोर येणारी विश्वास यांची कुटुंबासह दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या आपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. पत्नी दिपाली व मुले सार्थक, राजकुमार यांचा मृत्यू झाला. पती विश्वास हा गंभीर जखमी झाला.
संशयित जीप चालक कोळेकर याने पळ काढला. लोकांनी आपत्कालीन रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले व त्या सॊबत तिघांचे मृतदेह ही रुग्णालयात दिले. या घटनेने नातेवाईकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. या घटनेबाबत दशरथ याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. दशरथ हा विश्वासचा भाऊ आहे. संशयित जीप चालकास लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल असे पोलीस निरीक्षक किरण चौगुले म्हणाले.