बुधगाव | प्रतिनिधी

बुधगाव ता १३ : येथील ग्रामपंचायतीची स्थापना १३ डिसेंबर १९६० साली झाली. आज बुधगाव ग्रामपंचायतच्या ६४ व्या वर्धापनदिन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या वर्धपणानिमित्त सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ उपस्थित होते. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी ६४ व्या वर्धापनानिमित्त शुभेच्छा दिल्या तर बुधगाव ग्रामपंचायत कडून आमदार सुधीरदादा गाडगीळ सांगली विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी बुधगाव सरपंच वैशाली विक्रम पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे, ग्रामपंचायत सर्व सदस्य सदस्या तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य भाजपचे नेते विक्रम भाऊ पाटील, शिवसेनेचे नेते बजरंग भाऊ पाटील, प्रवीण पाटील, उदय मोरे, राष्ट्रवादीचे महेश सूर्यवंशी द journalist असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटना पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत यमगर तसेच गावातील सर्व राजकीय पक्ष्यांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
सध्याच्या ग्रामपंचायत ही पूर्वी श्रीमंत राजेसाहेब पटवर्धन यांच्या मालकीची……. थोडक्यात माहिती
