कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड शुक्रवार ता.१३ : शहरातील मुख्य रस्ता वाहतुकीस टप्प्याटप्प्याने सुरू. कुपवाडमधील महावीर व्यायाम शाळा ते संत रोहिदास महाराज चौकापर्यंतचा ट्रिमिक्स रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी क्युरिंग पिरेड पूर्ण झालेल्या रस्त्याचे खुला करण्याविषयी नगरसेवक गजानन मगदूम यांनी महापालिका अधिकारी व कुपवाड पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर तसेच सर्वपक्षीय बैठक व सर्व संघटनांना बोलवण्यात आली.
या बैठकीमध्ये महापालिकेचे नगर अभियंता आप्पा हलकुडे शाखा अभियंता अशोक कुंभार व कॉन्ट्रॅक्टर मोहन कुंभार यांनी झालेल्या कामाची माहिती दिली. त्या माहितीनुसार महावीर व्यायम मंडळ ते बुधगाव रोड पर्यंतचा रस्ता पुर्ण क्षमतेने खुला करण्यासाठी सूचना दिल्या गेलेत. त्यासूचनेने अधिकारी व प्रशासनाच्या वतीने रस्ता खुला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक गजानन मगदूम, नगरसेवक शेडजी मोहिते, कुपवाड विकास सोसायटीचे चेअरमन संजय संघाजे, बंडु पाटील, अनिल कवठेकर, बिरू आस्की, रमेश जाधव, आशुतोष धोत्रे, विजय खोत, अरुण रुपनर, श्याम भाट, दादासो पाटील, भाऊसाहेब पाटील, सतीश पाटील, रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते व्यापारी खोकीधारक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.