
तासगाव : तालुक्यातील वायफळे येथील एकाच कुटुंबातील सहा जणांवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात रोहितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. रोहित संजय फाळके खून व त्याच्या कुटूंबावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या. पुणे येथे ही कारवाई केली. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात आरोपिला गजाआड केले. विशाल फाळके हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तासगाव पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे (पुणे शहर), वारजे माळवाडी पोलीस ठाणे (पुणे शहर), बिबवेवाडी पोलीस ठाणे (पुणे शहर), शिवाजीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो मोक्कामधील आरोपी आहे.