प्रतिनिधी

नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आणणारे मा.विनोद निकाळजे केंद्रीय कमिटी सदस्य आणि ईशान्य भारत प्रभारी आरपीआय ( आठवले ) यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संधी मिळावी ही सर्वसामान्य जनतेची मागणी.
निकाळजे यांनी मा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन चळवळीचे दोन आमदार निवडून आणले आहेत. येणाऱ्या काळात ईशान्य भारताच्या काही राज्यात आणखी आमदार, खासदार निवडून आणण्यासाठी त्यांनीकंबर कसली आहे. स्वतःच्या ताकतीवर गेल्या साठ वर्षात रिपब्लिकन चळवळीत पहिल्यांदा आमदार निवडून आणले आहेत. आणि काही राज्यात दुसऱ्याक्रमांकावर राहिले आहेत. विनोद निकाळजे यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे नेतृत्व आहे.
त्यामुळे अनेक जिल्ह्यातून,अनेक राज्यातून,लोक मा. रामदासजी आठवले साहेब यांना विनोद निकाळजे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मागणी करत आहेत.