कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड MIDC : येथील भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीत अज्ञात चोरट्यांकडून १२ लाख ५२ हजाराची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत आज (ता.२१) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेची फिर्याद सुरज संभाजी कळंत्रे वय ३४ वर्ष, व्यवसाय – नोकरी, रा. कांचंनपुर, ता.मिरज, जि. सांगली यांनी दिली.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार भारत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अँड मॅन्युफॅक्चरर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑफिस ब्लॉक नंबर जे ७८ MIDC कुपवाड या कंपनीत (ता.१९) सायंकाळी साडेसहा पासून ते (ता.२०) रोजी सकाळी साडेनऊ दरम्यान अज्ञात चोरट्यांकडून कंपनीत असलेली दोन हजार रुपयांची चॉकलेटी रंग व पिवळ्या रंगाचा दरवाजा असणारी लहान लोखंडी तिजोरीसह त्यातील १२ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम (५०० रुपये चलनाच्या २५०० नोटा ) ही रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय अज्ञात चोरट्याने चोरूली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर हे करीत आहे.