कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड MIDC ता.२४ : मधील भारत इलेक्ट्रिकल अँड मॅन्युफॅक्चर प्रा. लि. या कंपनीत बारा लाख पन्नास हजाराची रोकड चोरी करणारे दोन संशयित कुपवाड पोलिसांच्या ताब्यात. ताब्यात घेतलेल्या सतीश लक्ष्मण उमडाळे (वय ३३ वर्ष) व अक्षय संजय भंडारे (वय २४ वर्ष रा. बाजारपेठ, बुधगाव) या दोघांकडून चोरीस गेलेली बारा लाख पन्नास हजाराची रुपयांची रोकड त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार ता.१९ सायंकाळी ते ता.२० सकाळच्या दरम्यान भारत इलेक्ट्रिकल अँड मॅन्युफॅक्चर प्रा. लि. या कंपनीत बारा लाख पन्नास हजाराची रोकड तिजोरीसह अज्ञातांनी चोरून नेल्याची तक्रार सूरज संभाजी कंळत्रे ( वय ३४ वर्ष, रा.कंचनपूर ) कुपवाड पोलिसांत (ता.२१) दिली होती. त्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून चोरीचा शोध घेण्यास रवाना केली. रवाना केलेल्या पथकाने काही कालावधीच्या आत शनिवारी (ता.२१) संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील तिजोरीसह बारा लाख पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. संशयितिकडे चौकशी केली असता संशयित पूर्वी त्या कंपनीमध्ये कामास असल्याचे सांगितले. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.