
कुपवाड MIDC मधील एका कंपणीच्या संरक्षण भिंतीवर तीन चाकी प्रवाशी रिक्षा आदळल्याने रिक्षाची पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपघातात रिक्षा चालक व कामगार प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. सदर घटना आज (ता.२२) सकाळी आठच्या दरम्यान घडली.
घटनास्थळ व स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रवाशी रिक्षा चालक हा कुपवाडहुन MIDC मधील एका कंपनीत कामगार प्रवाशी सोडण्यास जात असताना सर्वत्र धुके पसरले होते. वातावरणात गारवा होता. त्या धुक्यातुन मार्ग काढत रिक्षा चालवताना रस्त्याच्या एका वळणावर वळण घेत असताना धुक्यामुळे पुढचे काही दिसत नव्हते रिक्षाचा ब्रेक ही लागला नाही. त्यामुळे प्रवाशी रिक्षा थेट कंपनीच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली. असे चालकाने आपघात ठिकाणी जमलेल्या स्थानिक नागरिकांना सांगितले. रिक्षा चालक व प्रवाशी यांना स्थानिक रिक्षा स्टापमधील एका रिक्षा चालकाने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. याबाबत कुपवाड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नाही.