कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये सन २०११ पासून अग्निशमन विभाग सुरु झालेला आहे. या विभागामुळे औद्योगिक परिसर तसेच सुमारे ५ कि.मी. अंतरावरील परिसरातील आगीच्या घटना काबू करण्यात शिवाय आगीने होणारे आर्थिक नुकसान/जीवितहानी वाचविण्यात या विभागाला यश आले आहे. अग्निशमन विभागाच्या सेवा सुविधा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने प्राप्त व्हाव्यात यासाठी कृष्णा व्हॅली चेंबरने शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे. त्याचबरोबर चेंबरने जादा अग्निशमन बंब कुपवाड विभागाला द्यावा अशी मागणी केली होती, त्या मागणीला शासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून आणखीन एक अत्याधुनिक अग्निशमन बंब मंजूर केलेले आहे.


या गाडीची वैशिष्ट्ये म्हणजे हायड्रोलिक रेस्क्यू ट्युल्स, फोम सिस्टीम, पूर्वी ४५०० लिटर पाणी क्षमता असलेली टाकी आता ३००० लिटर ने वाढवून ७५०० इतकी क्षमता या गाडी मध्ये उपलब्ध आहे. त्याच बरोबर रात्रीच्या अंधारात आगीवर काबू करण्यासाठी सुमारे ३० फुट उंचीवर फिरते स्ट्रीट लाईट हॅलोजन सुविधा हि उपलब्ध आहे.

सध्या या विभागात फायर ऑफिसर एस.एम. जाधव, चालक बी.बी. वरेकर, व्ही.जी. पाटील यांच्यासह १० जणांचा स्टाफ २४ तास कार्यरत आहे.
यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, संचालक हरिभाऊ गुरव, रमेश आरवाडे, व्यवस्थापक अमोल पाटील यांनी या गाडीची माहिती फायर ऑफिसर एस.एन. जाधव यांच्याकडून करून घेतली.