
सांगली जिल्ह्यातील जतमधील चंद्राम एगाप्पागोळ यांच्या कारवर कंटेनर पलटी झाल्याने या एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना ता.२१ सकाळी अकाराच्या सुमारास घडली. सदर दुर्घटना बंगळूर जिल्ह्यातील नेलमंगल तालुक्यातील तळकेरेजवळ ही घडली आहे. या भीषण आपघातात चंद्राम इरगोंड एगाप्पागोळ (वय ४५), पत्नी गौराबाई एगाप्पागोळ, मुलगा जॉन, मुलगी दिक्षा, चंद्राम यांच्या भावाची पत्नी विजयलक्ष्मी मल्लिनाथ एगाप्पागोळ, मुलगी आर्या (वय ६ ) सध्या रा. बंगळूर, मुळगाव मोरबगी, ता. जत, जि. सांगली मृत झालेले आहेत.
एगाप्पागोळ हे कुटुंब आपल्या मूळगावी येत असताना अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
हा आपघात पुणे – बंगळूर महामार्गावरील नेलमंगल, तळकेरे या गावात झाला.अपघातानंतर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी तीन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली. सदर घटनेची नोंद नेलमंगल पोलिसांत झाली आहे.