
कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड , ता.३१ मधील नागरिक, छोटे, मोठे व्यावसायिक यांच्या मालमत्तेवर गेल्या काही दिवसांपासून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने खाजगी यंत्रणेमार्फत सर्व्हे करून घरपट्टी आकारणी केली आहे. घरपट्टी वाढ ही जुन्या आणि नव्या झालेल्या आकारणी मध्ये तफावत आहे. त्यामुळे केली गेलेली दरवाढ ही पूर्णपणे चुकीची व मनमानी पध्दतीने आकारण्यात आली असून या बाबत नागरिकांच्या मध्ये तीव्र प्रमाणात नाराजी असून भीतीचे वातावरण आहे. सदर आकारलेली घरपट्टी दरवाढ अवाजवी व अवास्तव कर कुपवाड शहराच्या नागरिकांना मिळणाऱ्या सांगली मिरजेच्या तुलनेत अपुऱ्या व काही सुविधा नसताना जास्तीचा कर आकारण्यात आला आहे.
तो अन्यायी स्वरूपाचा आहे.मोकळ्या प्लॉट व भाडेकरू असलेल्या घर, इमारती यांना अवाजवी मनमानी पध्दतीने कर आकारणी करण्यात आलेली आहे. ड्रेनेज योजना अजून अपूर्ण असताना मलनिस्सारण कर, दुरुस्ती खर्च, सामान्य कराच्या माध्यमातून कर लादला गेला आहे. काही ठिकाणी दिलेल्या नोटीसीमध्ये प्लॉटधारक मालक असताना नोटीस राहत असलेल्या भाडेकरूंच्या नावाने दिल्या गेल्या आहेत. नावात चुका आहेत. यामध्ये त्रुटी आहेत हे अति.आयुक्तसो व प्रभाग समिती क्र.०३ च्या सहा.आयुक्तसो यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. सदरबाब कुपवाडकर नागरिक, व्यावसायिक यांना मान्य नाही. सदर वाढीव आकारणी कर आकारणी रद्द न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे.


यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.सनी धोतरे, व्यापार संघटनेचे अध्यक्ष मा.अमर दिडवळ,अनिल कवठेकर,राजेंद्र पवार,प्रकाश व्हनकडे, प्रकाश पाटील,समीर मुजावर,बिरु आस्की,विठ्ठल संकपाळ,अमोल कदम,सुरेश साखळकर,प्रमोद गौडाजे, निलेश चौगुले,सचिन नरदेकर,अमरदीप गाडेकर,अभिजीत कोल्हापूरे,शाम भाट, जगन्नाथ वाघमोडे,मुद्दसर मुजावर,प्रदीप जाधव,मंगेश सातपुते,मनोज आदाटे उपस्थित होते..