
धुळ्यातील नकाने येथील पाच हफ्ताचे लाडक्या बहिणीच्या ७५०० रुपये खात्यावरून परत घेतल्याच्या बातमीने सर्वत्र धुमाकूळ घातला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सत्र सुरू केले.आता याचे सत्य समोर आलेले आहे.
नकाणे येथील खैरनार या महिलेने सांगितले की, सरकारने पैसे परत घेतले नाहीत. तर त्यांनीच सरकारला पैसे परत दिले. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना चुकून मुलीचे आधार कार्ड देण्यात आले होते. त्यामुळे मुलाच्या खात्यावर लाडकी बहीण पैसे जमा होत असल्याने महिलेने बालविकास विभागात संपर्क साधून पैसे जमा केले. अर्ज भरलेला अर्ज क्रमांक बाद झाला. नव्याने पुन्हा अर्जाची कागदपत्रे जमा केली. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता येण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगितले आहे.